Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दोन कोटींची फसवणूक: बंडखोर भाजप नेते रत्नाकर पवार यांना अटक

पुणे वृत्तसंस्था । दीड कोटीच्या फसवणूक प्रकरणी नाशिक येथील बांधकाम व्यावसायिक आणि बंडखोर भाजप नेते रत्नाकर ज्ञानदेव पवार आणि अशोक तुळशीराम अहिरे या दोघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. व्यवसायात एकत्र भागीदारी करुन आकर्षक मोबदला देण्याच्या आमिषाने ही फसवणूक करण्यात आल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. या प्रकरणात कोंढवा पोलिसांनी या अगोदर काही जणांना अटक केली आहे.

रत्नाकर पवार हे नाशिकमधील भाजपचे नेते आहेत. रत्नाकर पवार यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करत निवडणूक लढवली होती. कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पवार यांनी सत्र न्यायालय, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयापर्यंत अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यामुळे तब्बल सहा महिन्यांच्या प्रयत्नानंतर कोंढवा पोलिसांना त्यांना अटक करण्यास यश आले.

कोंढव्यात राहणाऱ्या 36 वर्षीय मोहद्दीस महंमद फारुख बखला यांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलिसांनी रत्नाकर पवार यांच्यासह इतर साथीदारांवर कारवाई केली.

Exit mobile version