दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी; किरकोळ कारणावरून झाला वाद

पहुर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथे घराच्या ओट्यावर बांधकामाचे पाणी व घाण टाकल्याच्या कारणावरून दोन कुटुंबात तुफान हाणामारी झाल्याची घटना बुधवार १७ मे रोजी दुपारी १२ वाजता घडली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की,  समाधान भागवत फरकांडे (वय-४०) आणि सुधाकर रामदास मोहने (वय-४६) दोन्ही रा. पिंपळगाव बुद्रुक ता. जामनेर येथील रहिवाशी आहेत.  बुधवार १७ मे रोजी दुपारी १२ वाजता सुधाकर मोहने याने समाधान फरकांडे यांच्या घराच्या ओट्यावर बांधकामाचे घाण व पाणी टाकल्याच्या कारणावरून वाद झाला. या वादातून सुधाकर रामदास मोहने, हर्षल विजय मोहने, कल्पेश सुधाकर मोहने, आणि उषाबाई सुधाकर मोहन आणि दुसऱ्या कुटुंबातील समाधान भागवत फरकांडे, मंगलाबाई भागवत फरकांडे, राधाबाई भागवत शेळके आणि विष्णू भगवान शेळके यांच्यात तुंबळ हाणामारी होऊन एकमेकांना मारहाण केली. या मारहाणीमध्ये तीन जण जखमी झाले आहे.  तसेच एकमेकांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. हा प्रकार घडल्यानंतर दोन्ही गटातील सदस्य पहुर पोलीस ठाण्यात धाव घेऊन एकमेकांविरोधात तक्रार दिली आहे त्यानुसार पहूर पोलीस पहिल्या गटातील सुधाकर रामदास मोहने, हर्षल विजय मोहने, कल्पेश सुधाकर मोहने, उषाबाई सुधाकर मोहने आणि दुसऱ्या गटातील समाधान भागवत फरकांडे, मंगलाबाई भागवत फरकांडे, राधाबाई भगवान शेळके आणि विष्णू भगवान शेळके या ८ जणांनी विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार प्रकाश पाटील आणि हंसराज मोरे करीत आहे.

Protected Content