Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दोघी भावांना फायटरने केली बेदम मारहाण

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील कजगाव येथे काहीही कारण नसतांना दोघा भावांना फायटरने बेदम मारहाण करून जखमी करत खिश्यातील ४ हजार ८०० रूपयांची रोकड जबरी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रविवारी १२ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता भडगाव पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, निलेश सर्जेराव पाटील (वय-२४) रा. भोरटेक बुद्रुक ता. पाचोरा हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १० फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास गावाजवळील कजगाव येथे निलेश पाटील आणि त्याचा चुलत भाऊ दत्तू शामराव पाटील हे दोघे शनीमंदीराजवळ उभे होते. त्यावेळी काहीही कारण नसतांना कजगाव गावातील विश्वजीत साहेबराव पाटील, कार्तिक रणजित राजपूत, मुन्ना मुक्तारसिंग राजपूत आणि बाळू उर्फ हितेश ईश्वर राजपूत सर्व रा. कजगाव ता. भडगाव यांनी फायटरने दोघांना बेदम मारहाण केली. या मारहाणातीत निलेश पाटील आणि दत्तू पाटील हे दोघे जखमी झाले. तसेच एकाने दत्तू पाटील याच्या खिश्यातील ४ हजार ८०० रूपयांची रोकड जबरी काढून चोरी केली. हा प्रकार घडल्यानंतर निलेश पाटील याने भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी विश्वजीत साहेबराव पाटील, कार्तिक रणजित राजपूत, मुन्ना मुक्तारसिंग राजपूत आणि बाळू उर्फ हितेश ईश्वर राजपूत सर्व रा. कजगाव ता. भडगाव यांच्याविरोधात रविवारी १२ फेब्रुवारी रोजी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे करीत आहे.

Exit mobile version