Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दोघांना धमकावून लुटणारा आरोपी अटकेत

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील दोन जणांना चाकूच्या धाकावर लुटणारा तस्लीम उर्फ काल्या या आरोपीला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे की, तुषार माणिक चौधरी (रा. विकास कॉलनी) यांना ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास तस्लीम उर्फ काल्या याने चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडी १५५० रूपये जबरीने काढून घेतले. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्थानकात भाग ५ गुरनं ०८१२/२०२० भादंवि कलम-३९४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, कालच मनोजकुमार अशोककुमार वाधवानी यांना तस्लिम उर्फ काल्या याने त्याच्या जवळ चाकू बाळगून फिर्यादिस ५०००/-रु दरमहा व किराणा माल न दिल्यास जावे मारण्याची धमकी दिली. या अनुषंगाने भुसावळ बाजारपेठ पो स्टे भाग ५ गुरनं ८११/२०२० भादंवि कलम-३८४,५०६,३४प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

वरील दोन्ही गुन्ह्यातील आरोपी नाव तस्लिम उर्फ काल्या सलीम शेख ( वय- २८, रा. दिनदयाळ नगर भुसावळ) याची पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरून आरोपीस भुसावळ शहरातून दीनदयाळ नगर भागातून ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके व उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक अनिल मोरे,पोहेका सुनील जोशी, जयराम खोडपे, पोना किशोर महाजन, रवींद्र बिर्‍हाडे, समाधान पाटील, रमण सुरळकर, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी,कृष्णा देशमुख वाहन चालक पो का बंटी कापनडे यांच्या पथकाने केली आहे.

Exit mobile version