Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

देशात सहा महिन्यानंतर पहिल्यांदाच कोरोना रुग्णसंख्या २० हजारांपेक्षा कमी

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । देशात पूर्ण वर्ष कोरोनाच्या मगरमिठीत गेलं. आता देशातील कोरोनाचा प्रसार आटोक्यात येताना दिसत आहे. तब्बल सहा महिन्यानंतर दिलासा मिळणारी आकडेवारी समोर आली आहे. देशात मागील २४ तासात २० हजारांपेक्षाही कमी रुग्ण आढळून आले आहेत.

देशात मागील २४ तासांत १८ हजार ७३२ नवीन बाधित रुग्ण आढळून आले आहेत. नव्या रुग्णसंख्येमुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या १ कोटी १ लाख ८७ हजार ८५० इतकी झाली आहे. नवीन रुग्णांबरोबरच देशात २४ तासांत २७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत १ लाख ४७ हजार ६२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या २ लाख ७८ हजार ६९० रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत ९७ लाख ६१ हजार ५३८ जण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या २४ तासांत देशभरात २१ हजार ४३० रुग्ण घरी परतले आहेत.

राज्यात २ हजार ८५४ नवे कोरोनाबाधित आढळले असून, ६० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय १ हजार ५२६ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देखील मिळाला आहे. राज्यातील बाधितांची एकूण संख्या आता १९ लाख १६ हजार २३६ वर पोहचली आहे. महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ९४.३४ टक्के इतका झाला आहे.

Exit mobile version