Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

देशात शनिवारी ९३ हजार नवीन रुग्ण; ५१३ जणांचा मृत्यू

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । देशभरात मागील २४ तासांत ९३ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले  नव्या वर्षातील सर्वात मोठा रुग्णवाढीचा उच्चांक नोंदवला गेला आहे.  २४ तासांच्या कालावधीत पाचशेहून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

 

कोरोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस चिंतेत भर टाकू लागली आहे. फेब्रुवारीपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं डोकं वर काढलं होतं. त्यानंतर संसर्गाचा वेग प्रचंड वाढला

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मागील २४ तासांतील   रुग्णसंख्येची  आणि लसीकरणाची माहिती प्रसिद्ध केली आहे. देशभरात २४ तासांत ९३ हजार २४९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे.  ५१३ रुग्णांचा  मृत्यू झाला आहे. याच कालावधीत ६० हजार ४८ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. सध्या देशात ६ लाख ९१ हजार ५९७ रुग्ण उपचार घेत असून, आतापर्यंत १ लाख ६४ हजार ६२३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

 

 

देशामध्ये इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. राज्यात शनिवारी ४९ हजार ४४७  बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर २७७ जणांचा मृत्यू झाला. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही चार लाखांवर गेली आहे. मृतांमध्ये सर्वाधिक पुणे शहर ३७, नाशिक शहर १५, औरंगाबाद शहर ३१, नांदेड शहर १३, नागपूर शहर २१, उर्वरित नागपूर जिल्हा १४ जणांचा समावेश आहे.  पचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ७३,५९९ रुग्ण आहेत. मुंबई ६०,८४६, नाशिक ३१,५१२, औरंगाबाद १४,३०२, नागपूर जिल्हा ५२,४०८ रुग्ण उपचाराधीन आहेत.

Exit mobile version