Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

देशात पहिल्यांदाच दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या २ लाखांच्या पुढे

 

 नवी दिल्ली : वृत्तसंस्था । देशात कोरोनाचा कहर अद्यापही सुरु असून दैनंदिन रुग्णसंख्येने दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या २४ तासांत २ लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत.सलग दुसऱ्या दिवशी एक हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

गेल्या २४ तासात ९३ हजार ५२८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले  आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

 

देशात गेल्या २४ तासात २ लाख ७३९ कोरोना रुग्ण आढळले  १०३८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  देशातील एकूण रुग्णसंख्या १ कोटी ४० लाख ७४ हजार ५६४ वर पोहोचली आहे. आतापर्यंत १ कोटी २४ लाख २९ हजार ५६४ जण उपचारानंतर बरे झाले आहेत.  देशात सध्या १४ लाख ७१ हजार ८७७ अॅक्टिव्ह रुग्ण असून मृत रुग्णांची संख्या १ लाख ७३ हजार १२३ इतकी झाली आहे. आतापर्यंत ११ कोटी ४४ लाख ९३ हजार २३८ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

 

 

बुधवारी देशात एक लाख ८४ हजार ३७२ रुग्ण आढळले होते. दैनंदिन रुग्णवाढीचा हा आतापर्यंतचा उच्चांक होता. मात्र गुरुवारी रुग्णसंख्या दोन लाखांच्या पुढे गेली आणि नव्या उच्चांकाची नोंद झाली. बुधवारी कोरोनाने १,०२७ जणांचा बळी घेतला. गेल्या सहा महिन्यांतील करोनाबळींचा हा उच्चांक होता.

 

 

 

देशात सर्वाधिक रुग्णवाढ महाराष्ट्रात नोंदवली जात आहे. इतर राज्यांतही रुग्णवाढ झपाट्याने होत असून, गेल्या २४ तासांत उत्तर प्रदेशात २०,५१२ नवे रुग्ण आढळले. याच कालावधीत तिथे ६७ रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रापाठोपाठ छत्तीसगडमध्ये १५६ बळींची नोंद झाली. छत्तीसगडमध्ये दैनंदिन रुग्णवाढीने १५ हजारांचा टप्पा ओलांडला. मध्यप्रदेशात दिवसभरात ८,९९८ रुग्ण आढळले तर ५१ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. आता महाराष्ट्राबरोबरच उत्तरप्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड, मध्यप्रदेश आदी राज्यांत मोठी रुग्णवाढ होत आहे.

Exit mobile version