Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

देशात कोरोना बाधितांची संख्या प्रथमच लाखाच्या खाली

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । देशात आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे.नव्या बाधितांच्या व मृत्यू झालेल्यांच्या संख्येत घट होत आहे. काल प्रथमच दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या एक लाखाच्याही खाली आली आहे.

 

गेल्या २४ तासांत देशामध्ये ८६ हजार ४९८ नव्या  बाधितांची नोंद झाली. एका दिवसात एक लाखाहूनही कमी बाधित आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुक्त होणाऱ्यांची संख्या  बाधितांच्या संख्येपेक्षा जास्तच आहे. देशात काल दिवसभरात एक लाख ८२ हजार २८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले सध्या उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या १३ लाख ३हजार ७०२ झाली आहे.

 

 

 

मृत्यूंची संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे. काल दिवसभरातल्या देशातल्या मृत्यूंची संख्या २,१२३ आहे. त्यामुळे देशातल्या मृत्यूंची एकूण संख्या आता तीन लाख ५१ हजार ३०९वर पोहोचली आहे.

 

देशात लसीकरण मोहिमही वेगात सुरु आहे. गेल्या २४ तासात देशातल्या ३३ लाख ६४ हजार ४७६ नागरिकांनी लस घेतली. त्यापैकी ३० लाख ३८ हजार २८९ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या तीन लाख २६ हजार १८७ आहे.

 

करोना प्रतिबंधक लसीकरणाच्या धोरणामध्ये महत्त्वपूर्ण बदल करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील १८ वर्षांवरील सर्वाचे मोफत लसीकरण करण्याची घोषणा सोमवारी केली. नवे धोरण २१ जूनपासून लागू होणार असून, संपूर्ण लसखरेदी केंद्राकडूनच करण्यात येईल. त्यामुळे लसीकरणाच्या आर्थिक ओझ्यातून राज्यांची मुक्तता होणार आहे.

 

Exit mobile version