Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

देशातील ७३ जिल्ह्यात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची चिन्हे

 

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ।  “देशातील ७३ जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची चिन्हे दिसत आहेत , असे आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव  यांनी म्हटले आहे

 

देशात सक्रिय रुग्णांची संख्या अत्यंत खाली आली आहे. संख्येत जवळपास ३० टक्के घट झाल्याने आता देशातील  रुग्ण  ५ लाखांपेक्षा कमी झाले आहेत.काही राज्यात अजूनही १० टक्के दराने रुग्ण  वाढत आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू, ओडिशा, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मेघालय, सिक्कीम यासारख्या राज्यांमध्ये १० टक्के पेक्षा जास्त पॉझिटीव्हीची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने  संसर्गाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल यांनी ही माहिती दिली.

 

कोरोनामुळे शरीरात रक्त गोठते. तसेच आणखी एक कारण म्हणजे लसीकरणानंतर  पडून राहील्यामुळे रक्त गोठते. त्यासाठी आम्ही ब्लड थिनर देतो. आता सर्वसामान्यांनाही साथीच्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी पुढे यावे लागेल. गर्दीत सामुदायिक जबाबदारी पार पाडावी लागेल.”

 

लव्ह अग्रवाल म्हणाले, हिलस्टेशन्सवर जाणारे लोक कोविड-प्रोटोकॉलचे अनुसरण करीत नाहीत. त्यांनी शासकीय मार्गदर्शक तत्वांचा योग्य प्रकारे पालन करावे, अन्यथा आम्ही पुन्हा निर्बंध लागू करु. आपण शासकीय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यास महामारी पुन्हा एक भयानक रूप  घेऊ शकते.

 

देशात थैमान घालणाऱ्या दुसऱ्या लाटेची मगरमिठी आता सैल होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून संसर्गाचा वेग कमी झाला असून, गेल्या २४ तासांतील आकडेवारी दिलासा देणारी आहे. १११ दिवसांनंतर म्हणजे जवळपास तीन महिन्यांनंतर रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. तर दुसरीकडे रिकव्हरी रेट म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढलं आहे. देशातील रिकव्हरी रेट ९७.१७ टक्क्यांवर पोहोचला आहे.

डेल्टा प्लस या विषाणूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत असून, हा विषाणू तिसऱ्या लाटेला कारणीभूत ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे देशात लसीकरणावर भर दिला जात आहे.

 

 

Exit mobile version