Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

देशातील कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी २३ लाखांवर

 

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा  वाढू लागला आहे. गेल्या २४ तासात देशात  ८१ हजार ४४६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण बाधितांची संख्या १ कोटी २३ लाखांवर पोहोचली आहे.

 

एका दिवसात नोंद होणारी ही गेल्या सहा महिन्यातील सर्वाधिक रुग्णवाढ आहे. याआधी ११ ऑक्टोबरला ७४ हजार ३८३ रुग्णांची नोंद झाली होती.

 

दरम्यान गेल्या २४ तासात ५० हजार ३५६ जण उपचारानंतर बरे झाले असून ४६९ जणांचा मृत्यू झाला आहे.  देशातील बाधितांची संख्या १ कोटी २३ लाख ३ हजार १३१ इतकी झाली आहे. १ कोटी १५ लाख २५ हजार ३९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सध्याच्या घडीला ६ लाख १४ हजार ६९६ अॅक्टिव्ह केसेस असून मृतांच्या संख्या १ लाख ६३ हजार ३९६ झाली आहे. देशात आतापर्यंत ६ कोटी ८७ लाख ८९ हजार १३८ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

 

 

महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, पंजाब, केरळ, तामिळनाडू, गुजरात आणि मध्य प्रदेशात सलग रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.  रुग्णवाढीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. राज्य सरकारने आरटी-पीसीआर टेस्टचा दर १००० वरुन ५०० वर आणला आहे.

 

Exit mobile version