Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

देशाची सध्याची स्थिती ही हुकूमशाही समान : जितेंद्र आव्हाड

download 1 2

बीड (वृत्तसंस्था) देशाची सध्याची स्थिती ही हुकूमशाही समान आहे. या स्थितीला ‘हिटलरशाही’ संबोधत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. बीडमध्ये बुधवारी ‘संविधान बचाव’ महासभा झाली, या वेळी ते बोलत होते.

 

या वेळी बोलताना आव्हाड यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचाही उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली. आव्हाड म्हणाले की, इंदिरा गांधींनीदेखील लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा अहमदाबादेतून पहिला उठाव झाला आणि विद्यार्थ्यांच्या चळवळीतूनच जयप्रकाश नारायण यांचे नेतृत्व उदयाला आले. अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांचे आंदोलन देशाला दुसरे स्वातंत्र्य मिळवून देईल, असेही ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर आव्हाड यांनी खुलासा करणारे ट्विट केले आहे. आव्हाड यांनी ट्विट व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले की, इंदिरा गांधी ह्यांच्या असामान्य कर्तुत्वाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. या सभेला माजी न्या. बी. जी. कोळसे पाटील, तिस्ता सेटलवाड, मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य मौलाना अबू तालिब रहेमानी, ‘जेएनयू’ची विद्यार्थिनी दीपशिखा धर आदी उपस्थित होते. आव्हाड यांनी देशातील सद्य:स्थितीला ‘हिटलरशाही’ संबोधत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली.

Exit mobile version