Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

देशाची अर्थव्यवस्था धोकादायक वळणावर-डॉ. मनमोहन सिंग

1557976596 manmohan singh

नवी दिल्ली | आपल्या अर्थव्यवस्थेच्या धोक्यांची जाण केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला नाहीच, शिवाय मंदीवर उपाय शोधण्याचीही इच्छा केंद्राला नाही, अशा शब्दांत माजी पंतप्रधान व अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारवर शरसंधान केले.

ते नियोजन मंडळाचे माजी उपाध्यक्ष मॉण्टेकसिंग अहलुवालिया यांच्या ‘बॅकस्टेज – द स्टोरी बिहाईंड इंडियाज हाय ग्रोथ ईयर्स’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळय़ात बोलत होते. सोहळय़ात बोलताना डॉ. मनमोहन सिंग यांनी मॉण्टेकसिंग यांनी विकास दरवाढीसाठी सुचवलेल्या अनेक उपाययोजनांचे समर्थन केले.

देशातील शेतकऱयांचे उत्पन्न 3 वर्षांत दुप्पट करण्याचे आश्वासन मोदी सरकारने दिलेय, पण त्यासाठी काय उपाययोजना राबवणार असा सवाल डॉ. मनमोहन सिंग यांनी केला. केंद्रातील विद्यमान नरेंद्र मोदी सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेतील ‘मंदी’ मानायलाच तयार नाही. हे देशासाठी चांगले नाही, असेही डॉ. मनमोहन यांनी सरकारला सुनावले. 2024-25 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्सचे लक्ष्य खरेच सकारात्मक आहे. पण त्यासाठी अनेक प्रभावी उपाययोजना राबवाव्या लागतील याची जाण मोदी सरकारला नाही, असा टोलाही डॉ. मनमोहन सिंग यांनी शेवटी लगावला.

Exit mobile version