Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

देशमुख महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची ‘मास्टरलाईन इंजिन ऑईल कंपनी’ला अभ्यास भेट

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील  रसायनशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी मास्टरलाईन इंजिन ऑइल कंपनीला अभ्यास भेट दिली.

 

सुमारे ७० विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा भाग म्हणून मास्टरलाईन इंजिन ऑईल कंपनीस भेट देत कामकाजाची माहिती जाणून घेतली. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस. आर. पाटील, रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सुनील शेलार, प्रा. एम. डी. बिर्ला, प्रा. एस. एम. झाल्टे विद्यार्थ्यांसोबत उपस्थित होते.

 

याप्रसंगी कंपनीचे जनरल मॅनेजर संजय भंडारी यांनी विद्यार्थ्यांना कंपनीतील निर्मिती होणाऱ्या विविध ऑईल प्रॉडक्टची माहिती दिली. यासोबत त्यांनी ऑईल कसे तयार होते, त्यासाठी कच्चा माल कोणता लागतो, लॅबमध्ये ऑईलची ग्रेड कशी तपासली जाते, व्हिस्कॉसिटी कशाला म्हणतात, फ्लॅश पॉईंट काय असतो तसेच ऑईल तयार झाल्यानंतर कशा पद्धतीने बॉटल्स, कॅन्समध्ये भरले जाते, स्टिकर कशी लागतात, मोल्डिंग मशिनमधून कॅन्स कशा तयार होतात, त्यासाठी कुठला कच्चा माल लागतो, तयार झालेले ऑईल्स कशा पद्धतीने पॅकेजिंग केले जाते, पॅकेजिंग गोडाऊनमधून ऑईल कशाप्रकारे विविध ठिकाणी पोहचविले जाते, त्यासाठी कंपनीची ट्रान्सपोर्ट व्यवस्था कशी काम करते, प्रशासन विभागातून कुठली कामे होतात. मास्टरलाईन इंजिन ऑइल कंपनीने विदेशामध्ये जो विस्तार केला आहे, त्याबद्दलही माहिती जाणून घेतली.

 

कुठल्या राज्यांमध्ये, देशांमध्ये मास्टरलाईन ऑईल कंपनीची उत्पादने जात आहे, याबाबत सखोल माहिती त्यांनी दिली. माहिती देतेवेळी प्रशासन विभागाचे व्यवस्थापक मनोज महाजन उपस्थित होते. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचीही उत्तरे यावेळी देण्यात आली. आभार प्रा. एम. डी. बिर्ला यांनी मानले.

Exit mobile version