Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

देशभरात गेल्या २४ तासांत आणखी ९०९ जणांना करोनाची लागण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशभरात गेल्या २४ तासांत आणखी ९०९ जणांना करोनाची लागण झाली असून ३४ जणांचा मृत्यू झाल्याने देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ८३५६ वर पोहोचली आहे तर मृतांची एकूण संख्या २७३ वर पोहोचली आहे.

 

केंद्रीय आरोग्यमंत्रालयाच्या माहितीनुसार देशातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा आता ८,३५६ इतका झाला आहे. तर एकूण २७३ लोकांचा आतापर्यंत बळी गेला आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाच्या प्रसाराचा वेग कमी असला तरी मृत्यूदर जास्त आहे. देशात समूह संक्रमण सुरु झाल्यास हा आकडा आणखी वाढू शकतो.

Exit mobile version