देशपांडे गल्लीतून तरूणाची दुचाकी लांबविली

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील देशपांडे गल्लीतील तरूणाची १५ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी शनिवार ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता एरंडोल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एरंडोल पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अजय अरुण पाटील (वय-38, रा. देशपांडे गल्ली, एरंडोल) हा तरुण आपल्या कुटुंबीयांचा वास्तव्याला आहे. मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतो. कामावर जाण्यासाठी त्याच्याकडे (एमएच १९ के १४१) क्रमांकाची दुचाकी आहे. २९ ऑक्टोबर रात्री ११ ते ३० ऑक्टोबर सकाळी ५ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांची १५ हजार रुपये किंमतीची घरासमोर लावलेली दुचाकी चोरून नेली. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला. परंतु दुचाकी कुठेही मिळून आले नाही. अखेरीस १ महिन्यानंतर शनिवार ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता एरंडोल पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील लोहार करीत आहे.

Protected Content