Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

देवेंद्र फडणवीस यांनी केले कै. हरीभाऊ जावळेंच्या कुटुंबियांचे सांत्वन (व्हिडीओ )

यावल प्रतिनिधी । माजी मुख्यमंत्री तथा राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज रात्री भालोद येथे भेट देऊन भाजपचे दिवंगत जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार/आमदार हरीभाऊ जावळे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

माजी मुख्यमंत्री तथा राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आज सायंकाळी जळगाव येथे आगमन झाले आहे. यानंतर त्यांनी लागलीच भालोद येथे रात्री नऊच्या सुमारास भेट दिली. याप्रसंगी त्यांच्या सोबत माजी मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री जयकुमार रावल, विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, माजी आमदार गुरुमुख जगवाणी यांची उपस्थिती होती. या मान्यवरांनी स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. हरीभाऊ यांच्या मातोश्री सुमनबाई जावळे, पत्नी कल्पना जावळे, मुलगा अमोल जावळे, बंधू अनिल जावळे आदींचे सांत्वन करून त्यांना धीर दिला.

यावेळी प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले, तहसीलदार जितेन्द्र कुवर, जिल्हा बँक संचालक गणेश नेहेते, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण चौधरी, सेकंडरी एज्युकेशन सोसायटी चेअरमन दिलीप हरी चौधरी, दूध सोसायटी चेअरमन संजय ढाके, उपसरपंच जाबीर खान समशेर खान, विकासो चेअरमन मनोज जावळे, डॉक्टर कुंदन फेगडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस म्हणाले की हरिभाऊ जावळे यांच्या निधनामुळे पक्षाची मोठी हानी झाली आहे हरिभाऊंनी लोकसभेत व विधानसभेत शेतकर्‍यांचे केळीचे अनेक प्रश्‍न मांडल. ते नेहमी शेतकर्‍यांच्या हितासाठी प्रयत्नशील होते. ते गेले असे अजूनही वाटत नाही. त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पक्ष व जावळे कुटुंबाची खूप मोठी हानी झाली आहे. पक्ष जावळे कुटुंबाच्या दु:खात सहभागी असल्याचे प्रतिपादन फडणवीस यांनी केले. या प्रसंगी डॉक्टर कुंदन फेगडे यांनी फडवणीस यांना शेळगाव गॅरेजला स्वर्गीय हरी भाऊंचे नाव द्यावे या आशयाचे निवेदन दिले.

खाली पहा : देवेंद्र फडणवीस यांच्या सांत्वनपर भेटीचा व्हिडीओ.

Exit mobile version