Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

देवांग कोष्टी समाजातील गुणवंतांचा होणार सन्मान

 

जळगाव, प्रतिनिधी । देवांग कोष्टी समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी शालीय साहित्य वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांचा मेडल देऊन सन्मानीत करण्यात येणार असून तरी विद्यार्थांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन देवांग कोष्टी समाजातर्फे करण्यात आले आहे.

शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील इयत्ता १ ली ते १२ वी तसेच प्रथमवर्ष, ब्दितीयवर्ष  व तृतीयवर्ष पदवीधर तसेच डिप्लोमा व डिग्री परिक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य
वह्या वाटपाचे तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना पदक (मेडल), चषक (ट्रॉफी) व सन्मान चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. तरी पालकांनी आपल्या पाल्यांची नावे त्यांच्या मार्कशिटसह देवांग कोष्टी समाज अध्यक्ष चंद्रकांत लक्ष्मण पांधारे यांच्याकडे त्वरीत जमा करावे असे आवाहन समाजाचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे. तसेच रविवार २४ जानेवारी रोजी संस्थेची त्रैमासिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा अध्यक्ष चंद्रकांत पांधारे यांच्या राहत्या घरी रिंग रोड, फाॅरेस्ट कॉलोनी येथे आयोजित करण्यात आली असून या सभेला समाजबांधव यांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version