Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

देवसगाव येथे ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा दाबून जागीच मृत्यू

जामनेर प्रतिनिधी । खळवाडीतून ट्रॅक्टर गावात नेत असतांना धूळ मातीत ट्रक्टर अडकल्याने ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी तालुक्यातील देवसगाव येथे घडली आहे. याप्रकरणी जामनेर पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील भीमराव शांताराम तायडे (वय २५) रा. देवगाव ता. जामनेर हा खळवाडीतून ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ बीजी ५१९५) गावात जात असताना रस्त्यावर असलेल्या धूळच्या खड्ड्यात पडल्याने ट्रॅक्टर पलटून चालक भिमराव तायडे यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना संध्याकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली आहे.
सपोनि काळे सर, स. फौजदार  राठोड, पो.ना. सचिन पाटील, पोहेको निलेश घुगे याचे पंचनाम्याचे काम सुरू आहे दरम्यान रात्री उशिरापर्यंत पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते

Exit mobile version