देवळी येथील शेतकरी गटाचे संत शिरोमणी सावता माळी अभियानात सहभाग

 

 

   चाळीसगाव: प्रतिनिधी । तालुक्यातील देवळी येथील क्रांतिवीर रेशीम उत्पादक शेतकरी गटाने  ‘विकेल ते पिकेल’ च्या धर्तीवर संत शिरोमणी सावता माळी  अभियानात सहभाग घेतला असून पेरूची लागवड करण्यात आली आहे.

 

कृषि तंत्रज्ञान व्यवथापन यंत्रणा आत्मा अंतर्गत तालुक्यातील देवळी येथील क्रांतिवीर रेशीम उत्पादक शेतकरी गटाने ‘विकेल ते पिकेल’ च्या धर्तीवर आधारित संत शिरोमणी सावता माळी या अभियानात सहभाग घेतला असून; या गटामार्फत  जी-विलास जातीचे पेरू लागवड करण्यात आलेली आहे. 50 रुपये प्रति किलो दराने जागेवर भाव मिळत असून जवळपास 25 टन उत्पादन निघण्याचा अंदाज आहे.

 

या शेतकरी गटाचे अध्यक्ष विवेक पद्माकर रणदिवे आहे. संत शिरोमणी सावता माळी हे अभियान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची  महत्वाकांक्षी योजना आहे  राज्यात कृषी विभागाच्या वतीने तिची अंमलबजावणी सुरू आहे. तालुक्यात आतापर्यंत 100 विक्री केंद्रांची निवड करण्यात आली आहे.

 

जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, प्रकल्प उपसंचालक मधुकर चौधरी, उपसंचालक कुर्बान तडवी,तालुका कृषी अधिकारी चंद्रशेखर साठे ( चाळीसगांव ) यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत आहे.  पाहणी करताना मंडळ कृषी अधिकारी विश्वनाथ सूर्यवंशी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा)चे ज्ञानेश्वर पवार, कृषि पर्यवेक्षक चव्हाण, कृषि सहाय्यक संजीव पगारे आदी उपस्थित होते.

Protected Content