Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

देवगाव शेत शिवारातून ३५ हजाराची ट्रक्टरच्या ट्रॉलीची चोरी

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील देवगाव येथील शेतकऱ्याच्या शेतातून ट्रक्टरच्या ट्रॉलीची चोरी झाल्याचे ११ जानेवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीला आहे. रात्री उशीरा तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आत्माराम रघुनाथ सोनवणे (वय-३६) रा. देवगाव ता.जि. जळगाव हे शेतीचे काम करून उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे ट्रक्टरची ३५ हजार रूपये किंमतीची ट्रॉली (एमएच १९ एएन ७३१३) आहे. शेतीसाठी या ट्रॉलीचा वापर करतात. देवगाव फाट्याजवळील शेत गट क्रमांक १२३ च्या गोडावून मध्ये ही ट्रॉली ठेवण्यात आली होती. १० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता ट्रॉली जागेवर होते. दुसऱ्या दिवशी ११ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता ट्रॉली जागेवर दिसून आली नाही. ट्रॉली कोणी नेली असेल म्हणून गावात विचारपूस केली असता कोणीच नेली नसल्याचे स्पष्ट झाले. आत्माराम सोनवणे यांनी रात्री उशीरा तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संदीप पाटील करीत आहे.

Exit mobile version