Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

देवकर आप्पा यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर

WhatsApp Image 2020 01 19 at 6.17.58 PM

धरणगाव, प्रतिनिधी | आपण समाजाचे देणे लागतो या विचारातुन आज माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या वाढदिवसानिमत्त साईदिप हॉस्पिटल सोनवद येथे डॉ. मंदार बी. पाटिल, पंडित हॉस्पिटल & केयर, डॉ भुषण चव्हाण हर्षदिप क्लिनिक यांच्या कडुन मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरात जवळपास ५१३ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या वाढदिवसानिमत्त  घेण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात ईसीजी तपासणी, गरजुंना औंषधी वाटप करण्यात आले. जवळपास ५१३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत २५० ईसीजी मधुमेह डायबेटिस २५०/ ३०० व नविन‌ तपासणीत डायबिटीज चे १५०/ २०० रुग्ण आढळून आलेत. त्याच्यावर योग्य ती औंषधी देऊन उपचार करण्यात आले. डॉ. नितीन पाटिल साईदिप हॉस्पिटल सोनवद राष्ट्रवादी कांग्रेस जिलाध्यक्ष डॉ. सेल डॉ विलास चव्हाण, डॉ. सुभाष पाटिल, डॉ. अश्वीनी चव्हाण, डॉ. हर्षल पाटिल आदी उपस्थित होते.  राष्ट्रवादी धरणगाव तालूकाध्यक्ष  धनराज माळी , जेष्ठ नेते रवि पाटिल,  मोहन नाना , नाटेश्वर पवार, देवरे आबा, माजी सरपंच नाना पाटिल, जिजाबराव पाटिल, मनोहर पवार, गुलाब पवार, संतोष पवार, अनिल परदेशी,शरद अहिरे, प्रेमराज सांवत, पंजाबराव सांवत, वसंतराव सोनवणे, संजू नाना ऊखळवाडी, जनार्दन पाटिल, प्रकाश पाटिल, चंद्रकांत पाटील, संजू शिरसाठ, हमिद पिंजारी, प्रदिप पाटिल, शरद आबा पाटिल, प्रदिप पाटिल, महेश पाटिल, महेश सांवत, जगदिश पाटिल बाभुळगाव व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे तालूक्यातील व परीसरातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस डॉक्टर सेल व धरणगाव तालुका राष्ट्रवादी कांग्रेस यांचे या उपक्रमाचे सर्वत्र कौंतुक होत आहे.

Exit mobile version