Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुर्गा अष्टमीनिमित्‍त कळमसरेत भवानी मातेचा यात्रोत्सव

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील कळमसरे येथील ग्रामदैवत असलेल्या भवानी मातेची उद्या दि.29 रोजी यात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. ही यात्रा दरवर्षी पाडव्यानंतर दुर्गा अष्टमीला साजरी केली जाते.

गावाच्या दक्षिणेला लहान भवानी मातेचे मंदिर असून गावाच्या पच्छीमेला शहापुर रसत्यावर गावापासुन दोन किलोमीटर अंतरावर मोठ्या भवानी मातेचे मंदिर आहे.हा यात्रोत्सव लहान भवानी मातेच्या मंदिर परिसरात भरविला जातो. या यात्रोत्सवाला सुमारे दीडशे वर्षाची परंपरा असून नवस फेडीसाठी मोठी गर्दी होत असते. भवानी मातेचा यात्रोत्सव एक दिवसाचा असला तरी व्यवसाय नोकरी तसेच कामानिमित्त बाहेर गावी असणारे आप्तेष्ट भाऊबंदकी या यात्रेनिमित्त गावाला एकत्र येऊन मनोभावे दर्शन घेत असतात.

सामूहिक नवस फेडीचा कार्यक्रम
कळमसरे गावात माळी समाजबांधव बहुसंख्य असल्यानेगेल्या दोन वर्षांपासून नवस फेडीचा कार्यक्रम देखील सामूहिक करण्यावर भर दिला जात आहे. दरम्यान सद्यस्थितीत भवानी मातेच्या मंदिरावर विद्युत रोशनाई करण्यात आली असून गावात उपहारगृहे, पाळना, खेळन्याची दुकाने आधीच दाखल झाली आहेत. रात्री लोकमनोरंजनासाठी बंडू नाना धुळेकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचे आयोजन करण्यात आले आहे. गावात ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी स्वछता, सुरळीत विजपुरवठा याबाबत दक्षता घेतली आहे. यात्रे दरम्यान शांतता प्रस्थापित करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन ग्रामपंचायत कळमसरेच्या वतीने करण्यात आले आहे

Exit mobile version