Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुबईत भारतीय जोडप्याची हत्या ; पाकिस्तानी नागरिकाला अटक

शारजा (वृत्तसंस्था) दुबईत राहणाऱ्या एका भारतीय जोडप्याची चोरीच्या उद्देशाने हत्या झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दुबई पोलिसांनी एका पाकिस्तानी नागरिकाला अटक केली आहे.

 

हिरेन अधिया आणि विधी अधिया असे या जोडप्याचे नाव आहे. ते दुबईतील अरेबियन रँचेसमध्ये राहत होते. 18 जून रोजी हे हत्याकांड घडले. दुबई पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तो पाकिस्तानी नागरिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपीकडून चोरी केलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. दरम्यान, दोन ते तीन वर्षांपूर्वी हे जोडपे दुबईत स्थायिक झाले होते. हिरेन अधिया यांचा शारजा येथे स्वतःचा व्यवसाय होत.

Exit mobile version