Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुध विक्री करणाऱ्या दुध व्यावसायिकाला दोघांकडून मारहाण

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दुध विक्री करण्याच्या कारणावरून एका दुध व्यावसायकाला दोन जणांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणगाव पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, चुडामन शामराव पाटील (वय-६२) रास. पष्टाणे ता.धरणगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती आणि दुध व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. धरणगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळाजवळील अमृत दुध डेअरी समोर दररोज ते त्यांचे मालकीचे दुध विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात. नेहमीप्रमाणे ११ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारा ते दुध विक्री करण्यासाठी खेड्यावरून धरणगाव शहरात आले होते. दरम्यान, दुध विक्री करण्याच्या कारणावरून धरणगाव शहरातील मराठे गल्लीत राहणारे राहूल विजय पाटील आणि मयूर विजय पाटील यांनी चुडामण पाटील यांना शिवीगाळ करून मारहाण केली. या मारहाणीत चुडामण यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना धरणगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रमोद पाटील करीत आहे.

Exit mobile version