Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुचाकी चोरीतील दुसऱ्या आरोपीलाही अटक; जिल्हा पेठ पोलीसांची कामगिरी !

जळगाव प्रतिनिधी । शहरातील छत्रपती शिवाजी क्रिडा संकुलातील चौधरी यात्रा कंपनीच्या कार्यालयासमोरुन दुचाकी लांबविणार्‍या दुसरा संशयित आरोपीलाही त्याच्या राहत्या घरातून जिल्हापेठ पोलिसांना यश आले आहे. जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पवन कैलास मोरे (वय-१८) रा. अमळगाव ता.अमळनेर असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यात यापुर्वी २३ नोव्हेंबर रोजी श्रीकांत प्रकाश मोरे (वय २४) अमळगाव ता. अमळनेर जिल्हा पेठ पोलीसांनी अटक केली होती.

शहरातील छत्रपती शिवाजी क्रिडा संकुल येथे चौधरी यात्रा कंपनीच्या कार्यालयात विनयकुमार अक्षयकुमार जोशी वय 56 रा. नेहरुनगर हे कामाला आहेत. 23 ऑक्टोंबर 2020 रोजी जोशी हे कार्यालयात आले. यावेळी त्यांनी नेहमीप्रमाणे त्यांची दुचाकी कार्यालयाच्या बाहेर स्टेडीयम कॉम्प्लेक्स आवारात पार्किंग केली. काम आटोपून घरी जाण्यासाठी निघाले असता, त्यांची दुचाकी क्र. एम.एच. 15 बी.एच.4533 ही चोरट्याने चोरुन नेल्याचे समोर आले होते. सर्वत्र शोध घेवूनही दुचाकी मिळून आल्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी जोशी यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दोन दिवसांपूर्वी नंदुरबार पोलिसांनी जिल्हापेठ पोलिसांनी पहिला आरोपी श्रीकांत मोरे याला अटक केली होती. त्याच्या ताब्यातील चोरीची दुचाकी हस्तगत केली आहे. आज पहाटे गुन्ह्यातील दुसरा आरोपी पवन मोरे याला राहत्या घरातून अटक केली. ही कारवाई जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रविण भोसले, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय सोनार, तुषार जावरे, शेखर जोशी यांनी केली. जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आज दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय सोनार करीत आहे.

Exit mobile version