Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुचाकी अपघातात वयोवृद्ध जखमी

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयासमोरील राष्ट्रीय महामार्गावर रस्ता क्रॉस करत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने ८० वर्षीय वयोवृद्ध जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत शुक्रवार १७ मार्च रोजी रात्री १० वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भूपेंद्र बिलाची जगताप (वय-८०) रा. गणेश कॉलनी, जळगाव असे जखमी झालेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे.

 

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, भूपेंद्र जगताप हे शुक्रवार १७ मार्च रोजी सकाळी १० वाजता शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय समोरील राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता क्रॉस करत असताना समोरून भरधाव वेगाने येणारी दुचाकी (एमएच २९ एएल ५८४९) ने जोरदार धडक दिली. या धडकेत भूपेंद्र जगताप हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान भूपेंद्र जगताप यांनी दिलेल्या तक्रारीवरून रात्री १० वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात दुचाकीवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल उषा सोनावणे करीत आहे.

Exit mobile version