Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुचाकी अपघातात दोघे गंभीर जखमी

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील इच्छादेवी चौकात दोन दुचाकींच्या अपघातात दोन जण जखमी झाल्याची घटना झाला होता. खासगी रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर रविवारी २८ जानेवारी रोजी मध्यरात्री १२ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दुचाकीवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ईजहारोद्दीन नमजमोद्दीन शेख (वय-४२, रा. तांबापुरा) हे २१ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता त्याचे सहकारी गुरुसैयद कलीम अल्ताफ नुरी यांच्यासोबत दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीडी ५९५५) ने ईच्छादेवी चौकातील पन्नालाल वखार येथून जात असतांना समोरून भरधाव वेगाने येणारी दुचाकी (एमएच १९ सीक्यू ४९०७) ने जोरदार धडक दिली. या धडकेत ईजहारोद्दिन शेख आणि गुरूसैय्यद कलीम अल्ताफ नुरी हे दोघे जखमी झाले व दुचाकीचेही नुकसान झाले. जखमींना शहरातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर रविवारी २८ जानेवारी रोजी रात्री १२ वाजता (एमएच १९ सीक्यू ४९०७) वरील अज्ञात चालकाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सचिन पाटील करत आहेत.

Exit mobile version