Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुचाकी अपघातात तरूणाच्या मृत्यूप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

जामनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पळासखेडा गावाजवळ समोरासमोर झालेल्या दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वराचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, श्रीकांत वासुदेव अहिरे रा. वाघ नगर, जळगाव हा तरुण २६ जून रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास (एमएच १९ डीजी ३८१६)  या दुचाकीने जळगाव येथून कामानिमित्त जामनेर येथे जाण्यासाठी मित्र गजानन सदाशिव सोर रा. त्रंबक नगर, महाबळ, जळगाव याच्यासोबत जाण्यासाठी निघाला. जळगाव ते जामनेर रस्त्यावर असलेल्या पाळसखेडा गुरजीचे येथे दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात श्रीकांत आहेर याचा मृत्यू झाला होता. दरम्यान दुचाकी ही हयगईने चालावीत असल्याने अपघात झाला. यासंदर्भात मयतासोबत असलेला गजानन सदाशिव सोर यांच्या विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद पाटील करीत आहे.

Exit mobile version