दुचाकी अपघातात तरूणाचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील डीकसाई गावाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने दिलेल्या धडकेत पायी जाणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मंगळवार १६ मे रोजी रात्री उशिरा दुचाकीधारकावर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  राजू उर्फ पिंटू दोधू पाटील (वय 40, रा. डिकसाई ता.जि. जळगाव) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

 

मिळालेली माहिती अशी की, राजू पाटील हा तरूण सोमवारी १५ मे रोजी रात्री ८ वाजता विदगाव येथून डिकसाईकडे पायी जाण्यासाठी निघाला होता. रस्त्यावरील जोशी आण्णा यांच्या शेता समोरून जात असताना मागून येणारी दुचाकी (एमएच १९ एएल २९७९) याने जोरदार धडक दिली. या धडकेत राजीव पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या अपघात प्रकरणी मयताचा चुलत भाऊ प्रदीप सज्जन चव्हाण रा. डिकसाई ता.जि. जळगाव डिक्साई याने दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकीधारक  समाधान संजय नाईक रा. डिकसाई ता.जि.जळगाव याच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी १६ मे रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल अनिल मोरे करीत आहे.

Protected Content