Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुचाकीच्या भीषण अपघातात एक ठार तर दुसरा गंभीर जखमी

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पिंपळे निशाने फाट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर झालेल्या अपघातात तरूण ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी १५ मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. महेंद्र हिलाल चित्ते (वय ४०) रा. पुंडलिक नगर श्रीराम नगर चोपडा असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, महेंद्र चित्ते हा तरूण लग्नाचे फेटे बांधून घरी चोपडा येथे सोमवारी १५ मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास (एमएच १९ एडब्ल्यू ४६९८) या दुचाकीवरून येत असतांना पिंपळे निशाणे गावाजवळील शगुन जिनिंग जवळ समोरून येणारी दुचाकी (एमएच १९ डीटी ९५८९) ने जोरदार धडक दिली. या धडकेत महेंद्र हिलाल चित्ते हा तरूण जागीच ठार झाला तर पवन कोळी ही गंभीर जखमी झाला. मयत महेंद्र हिलाल चित्ते यांचा मृतदेह धरणगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला असता डॉ. गिरीश चौधरी यांनी शवविच्छेदन केले. मयताचा भाऊ वासुदेव हिलाल चित्ते याने दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकीस्वार पवन कोळी याच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्र याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, आई, दोन भाऊ असा परिवार आहे. यावेळी चर्मकार संघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे, तालुका अध्यक्ष दिलीप वाघ, सचिव संतोष लिंगायत, जिल्हा संघटक धर्मराज मोरे यांनी रुग्णालयात जाऊन मयताच्या नातेवाईकांचे सांत्वन केले.

Exit mobile version