Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुचाकीची स्कूटीला धडक, अपघातात महिलेसह मुलगी जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील दादावाडी पसिरातील अष्टभुजा मंदिराजवळ एका भरधाव दुचाकीने स्कूटीला धडक दिल्याने या अपघातात स्कूटीवरील महिलेसह तिची मुलगी जखमी झाल्याची घटना गुरुवार, १८ मे रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातप्रकरणी दुचाकीस्वाराविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील गट नं २१२ प्लॉट नं १२ याठिकाणी वंदना किशोर साळुंखे ह्या वास्तव्यास आहेत. वंदना साळुंखे ह्या मुलगी हर्षाली हिच्या सोबत एम.एच. १९ ए.जे.९१४१ या क्रमाकांच्या दुचाकीने गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दादावाडी परिसरातून येत असतांना, अष्टभुजा मंदिराजवळ रस्त्यावर एम.पी. ४७ एम.सी.२४०४ या क्रमाकांच्या दुचाकीने वंदना साळुंखे यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरुन खाली पडल्याने वंदना तसेच त्यांची मुलगी हर्षाली ह्या दोन्ही जखमी झाल्या. वंदना यांचे उजव्या पायाचे हाड फ्रक्चर होवून त्यांच्या हाता, पायास तसेच डोक्यास दुखापत झाली तर हर्षाली हिच्या हातापायाला मुकामार लागून दुखापत झाली आहे. अपघातानंतर दुचाकीस्वार जागेवरच दुचाकी सोडून पसार झाला. या अपघातप्रकरणी वंदना साळुंखे यांच्या तक्रारीवरुन रात्री साडेअकरा वाजेचया सुमारास तालुका पोलिसात अपघातास कारणीभूत दुचाकीस्वार राजकुमार राजू काजदे रा. पांढरीप्लॉट, पिंप्राळा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रकाश चिंचोरे हे करीत आहेत.

Exit mobile version