Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुचाकीचा काच फोडल्याच्या संशयावरून पोलीसाकडून तरूणाला मारहाण

जळगाव प्रतिनिधी । दुचाकीचा काच फोडल्याच्या संशयावरून दादावाडी येथील किरण संजय चौधरी (वय-२७) या तरूणाला पोलीस कर्मचाऱ्यांने शिवीगाळ करून काठीने मारहाण केल्याची घटना शाहुनगरातील हनुमान मंदीरासमोर २ मार्च रोजी रात्री ८ वाजता घडली. याप्रकरणी ३ मार्च रोजी दुपारी जळगाव शहर पोलीसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दिलेल्या फिर्यादीनुसार, किरण संजय चौधरी हा तरूण कल्याणी नगर, दादावाडी परिसररात राहतो. कामाच्या निमित्ताने २ मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता शहरातील शाहु नगरातील हनुमान मंदीराजवळ आला. मंदीराजवळ थांबलेला असतांना पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचारी नटवर जाधव (पुर्ण नाव माहित नाही) येवून किरण चौधरी याला म्हणाला की, ‘दुचाकीचा काच तुच फोडला’ असे बोलून जवळील काठीने पायावर मारहाण केली व चापटाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी किरण चौधरी यांनी शहर पोलीसात पोलीस कर्मचारी नटवर जाधव याच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय येरूळे करीत आहे. 

Exit mobile version