Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुकानासमोरून गायीची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गावरील राजस्थान स्वीट मार्ट जवळून एकाची १५ हजार रूपये किंमतीची गायीची चोरी झाल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिलीप लुंबगिरी गोस्वामी (वय-३०) रा. दादावाडी, साई मंदिराजवळ जळगाव यांचे राष्ट्रीय महामार्गावर राजस्थान स्वीट मार्ट दुकान आहे. त्यांनी त्यांच्या मालकीची १५ हजार रुपये किमतीची गिर जातीची गाय बांधलेली होती. ८ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर दरम्यानच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी खुंट्याला दोरीला बांधलेली १५ हजार रुपये किमतीची गाय आज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले. त्यांनी परिसरात गायीचा सर्वत्र शोध घेतला परंतु त्यांना गाय कुठेही मिळाली नाही. अखेर गुरुवार १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ८ वाजता त्यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक नरेंद्र पाटील करीत आहे.

Exit mobile version