Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुकानातील सामान घेण्याच्या कारणावरून एकाला बेदम मारहाण

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील आठवडे बाजारात असलेल्या एका दुकानात सामान घेण्याच्या कारणावरून दुकानातील तरुणाला बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच गळ्यातील सोन्याची चैन व गल्ल्यातील २२ हजारांची रोकड जबरी हिसकावून दुकानातील सामानांची तोडफोड केल्याचे घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनीवारी १८ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता ८ जणांविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गणेश भगवान चौधरी (वय-४४) रा. तलाठी गल्ली, धरणगाव हे आपले परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचा भाचा निखिल संजय चौधरी यांचे धरणगाव शहरातील आठवडे बाजारात श्री इलेक्ट्रिक व फर्निचर दुकान आहे. या ठिकाणी १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता दुकानात सामान घेण्याच्या कारणावरून धनराज मांगो महाजन, किशोर मांगो महाजन, दिलीप मांगो महाजन, अनिल मांगो महाजन, राजू मांगो महाजन, गणेश मांगो महाजन, सुमित महाजन आणि मांगो महाजन सर्व रा. धरणगाव यांनी लाठ्या काठ्यांसह बेदम मारहाण करून निखिल चौधरी याला गंभीर दुखापत केली. तसेच त्याच्या गळ्यातील ८ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन आणि दुकानात ठेवलेले २२ हजार रुपयांची रोकड जबरी काढून घेतले आणि दुकानातील सामानांची तोडफोड केली. हा प्रकार घडल्यानंतर गणेश चौधरी यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शनिवारी १८ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रामदास पावरा करीत आहे.

Exit mobile version