Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दीपनगर प्रकल्प आणि परिसरातील प्रश्न ” राम भरोसे ” !

भुसावळ : प्रतिनिधी । औष्णिक विद्युत केंद्र दीपनगरच्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न ,प्रदूषणाचे प्रश्न, छोट्या व्यावसायिकांचा राखेचा प्रश्न, अधिकाऱ्यांची मनमानी यासंबंधी अनेक तक्रारी असल्याने ऊर्जा मंत्रालयापासून उपमुख्यमंत्री , मुख्यमंत्री यांचेकडे पत्र पाठवून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन यांनी केली आहे

उचित कार्यवाही न झाल्यास आपण कायदेशीर मार्गाचा अवलंब करून जनहित याचिकाही दाखल करू अशी माहिती त्यांनी दिली या प्रश्नांचा पाठपुरावा औषनिक विद्युत केंद्राच्या अधिकाऱ्यांकडे सातत्याने केला परंतु न्याय मिळाला नाही म्हणून समाधान महाजन यांनी मुंबई येथील कार्यालयात देखील पाठपुरावा केला तिथे तक्रारींची सोडवणूक करणे राहिले दूर मात्र त्या कार्यालयातील खनिकर्म संचालक पुरुषोत्तम जाधव उडवाउडवीची उत्तरे देत होते

तपशिलात जाऊन माहिती घेतली असता त्यांच्या कारभाराच्या अजब तऱ्हा निदर्शनास आल्या त्यांच्या नियुक्तीपासून त्यांच्या आजपर्यंतच्या कारभाराच्या पद्धती पाहिल्यावर त्यांच्याकडून प्रश्न सुटतील असे वाटत नाही
माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाचा गैरवापर करीत त्यांच्या खास मर्जीतला सेवानिवृत्त अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांची पात्रता नसतानाही महानिर्मिती कंपनीच्या खनिकर्म संचालक व खनिकर्म सल्लागार पदी बेकायदेशीर नियुक्ती केली एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांच्या कार्यकाळातील कुटील कारस्थान जनतेसमोर येऊ नये त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर वचक राहावा म्हणून लायकी नसताना HR ,CIVIL,FMC,Mahagems या विभागांचा जाधव यांच्यावर अतिरिक्त खात्याचा कार्यभार सोपविला होता

मध्यंतरी महानिर्मिती कंपनीत सलग दोन वर्षापासून व्यवस्थापकीय संचालक यांची नियुक्ती नसल्याने जाधव यांनी मनमानी पद्धतीने कारभार करीत कंपनीचे पैशाची लयलूट केली आहे. महानिर्मिती कंपनीचे प्रचंड आर्थिक नुकसान त्यांच्या अजब गजब सल्ल्यामुळे होत आहे त्यांच्या अर्थपूर्ण कारभाराची सखोल चौकशी करून कार्यवाही करण्यासाठी मी थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांच्यासह वरील सर्व मंत्र्यांचे सचिव, महानिर्मिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व संबंधित अधिकार्‍यांकडे केली आहे, असे महाजन यांनी सांगितले .

Exit mobile version