Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिशा सालियनच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती ; अंगावर नव्हते कपडे

मुंबई (वृत्तसंस्था) बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या शवविच्छेदन अहवालातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यात तिच्या अंगावर कपडे नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच ज्यावेळी दिशाचा मृतदेह पोलिसांना मिळाला होता, त्यावेळीही तिच्या अंगावर कपडे नव्हते, असेही यात नमूद करण्यात आले आहे.

‘टीव्ही-९’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. दिशा सालियनने ८ जूनला चौदाव्या मजल्यावरील आपल्या फ्लॅटमधून उडी मारुन आत्महत्या केली होती. त्या दिवशी दिशाच्या घरी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. ती त्या पार्टीत फार खूश होती. याबाबतचा एक व्हिडीओही तिने व्हॉट्सअॅपच्या ग्रुपमध्ये पोस्ट केला होता. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येपूर्वी माजी मॅनेजर दिशा सालियन हिने आत्महत्या केली होती. त्यामुळे आत्महत्या प्रकरणावरुन अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. दुसरीकडे दिशा सालियनच्या आई-वडिलांनी आपल्या मुलीची काही लोकं बदनामी करत असल्याची तक्रार दिली असल्याचे वृत्त आहे.

Exit mobile version