Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिव्यांगासाठी विशेष लसीकरण मोहीम राबवा : राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसची मागणी

जळगाव, प्रतिनिधी । कोरोना बचावासाठी लस प्रभावी असल्याचे महत्व आता नागरिकांना पटले आहे. यातच नागरिकांची लसीकरणासाठी गर्दी होत असतांना दिव्यांग बांधवांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.  त्यांच्यासाठी आठवड्यातून एक दिवस विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे  जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

 

राष्ट्रवादी युवती काँग्रेसने दिलेल्या निवेदनाचा आशय असा की,  जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना प्रधन्याने लसीकरण मोहिमेत सहभागी करून घेण्यात यावे.  जिल्ह्यातील  ग्रामीण, शहरी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात एक दिवस दिव्यांगाना लसीकरणाचे आयोजन राष्ट्रवादी युवती काँग्रेस करत असून तेथिल आरोग्य केंद्रात लस उपलब्ध करून दिव्यांगाची होत असलेली  हेळसांड थांबवण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.  दिव्यांगाना लसीकरणासाठी भल्या मोठ्या रांगेत तासन तास ताटकळत थांबावे लागत आहे. अशा लोकासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून लसीकरण मोहीमेत लस उपलब्ध करून व एक दिवस विशेष लसीकरण देऊन विशेष सहकार्य करावे अशी मागणी जळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे राष्ट्रवादी युवती काँग्रेस उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले, राष्ट्रवादी युवती काँग्रेस ग्रामीण कार्याध्यक्ष कोमल पाटील, जळगाव राष्ट्रवादी युवती काँग्रेस शहर अध्यक्षा आरोही नेवे यांनी केली.

 

Exit mobile version