Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिल्ली विधानसभेच्या मतमोजणीस प्रारंभ

jc8kolng evm and vvpat 625x300 20 March 19

दिल्ली वृत्तसंस्था । संपूर्ण देशाचे लक्ष लागून असणार्‍या दिल्ली विधानसभेसाठी अलीकडेच झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीस प्रारंभ झाला आहे.

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी ८ फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. यात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या ६७२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले होते. जामिया मिलिया, जेएनयू व शाहीनबाग येथील सीएएविरोधी आंदोलन हे निवडणुकीत प्रचाराचे मुद्दे बनले होते. ही निवडणूक आम आदमी पक्षासाठी अटीतटीची, भारतीय जनता पक्षासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नेतृत्व कसोटी पाहणारी, तर काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई आहे. यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, तसेच गोपाल राय व आतिशी (सर्व आप), भाजपचे आशीष सूद, तेजिंदरपाल बग्गा, विजेंदर गुप्ता आणि अरविंदरसिंह लवली, कृष्णा तीरथ, अलका लांबा हे महत्त्वाचे नेते आपले नशीब आजमावत आहेत.

दरम्यान, आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीस प्रारंभ झालेला आहे. मतदान झाल्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या बहुतांश एक्झीट पोलमध्ये आम आदमी पक्षाला पुन्हा एकदा बहुमत मिळणार असल्याचे दर्शविण्यात आले आहे. तथापि, भाजपने यापेक्षा वेगळा निकाल लागेल असा आशावाद व्यक्त केला आहे. या पार्श्‍वभूमिवर, नेमका काय निकाल लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version