Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिल्लीत सरकारकडून राजधर्माचे पालन झाले नाही ; काँग्रेसचे राष्ट्रपतींना निवेदन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीतील हिंसाचारादरम्यान केंद्र आणि दिल्ली सरकार मूक दर्शक बनली. हिंसा सुरू असताना सरकारकडून कुठलही पाऊल उचलली गेली नाहीत. त्यामुळे गृहमंत्री अमित शाहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी कॉंग्रेसने राष्ट्रपतींना दिलेल्या निवेदनात केली आहे.

दिल्ली हिंसाचार प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, आम्ही पुन्हा एकदा अशी मागणी करत आहोत की, अमित शहांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. कारण हिंसा रोखण्यासाठी ते असक्षम ठरले आहेत. तसेच आम्ही तुमच्याकडे मागणी करतो की, नागरिकांचे जीवन, संपत्ती आणि स्वातंत्र्य अबादित ठेवण्यात यावे. आम्ही अशी आशा करतो की, तुम्ही निर्णायक पाऊल उचलाल, असेही निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, दिल्लीमधील हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 34 वर पोहोचली आहे.

Exit mobile version