Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिल्लीत मंत्री,आमदाराकडूनच औषधं , ऑक्सिजनचा काळाबाजार ; दिल्ली भाजपाध्यक्षांचा आरोप

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ।  दिल्लीचे भाजपा अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी दिल्ली सरकारचे मंत्री आणि आमदार औषधं आणि ऑक्सिजनचा काळाबाजार करण्यात गुंतले आहेत. या संकटाला दिल्ली सरकार आणि आम आदमी पार्टीचं जबाबदार आहे असा आरोप केला आहे

 

 

संपूर्ण देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे.  दिल्लीतही रुग्णांची स्थिती भयावह आहे. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या, त्यामुळे वैद्यकीय सुविधांवर येणारा ताण, त्याचबरोबर औषधे, ऑक्सिजनचा तुटवडा अशा अनेक समस्या दिल्लीकरांपुढे आहेत.

 

“दिल्लीतले लोक केवळ श्वासासाठी लढत आहेत, भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेसारख्या इतरही संघटना लोकांना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. त्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. दिल्लीत १९ एप्रिलपासून लॉकडाउन आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तीन वेळा हा लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला. १० मे रोजी हा लॉकडाउन संपणार होता. मात्र लॉकडाउन आणखी आठवडाभर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आता १७ मेपर्यंत हा लॉकडाउन असणार आहे. या आठवडाभराच्या लॉकडाउनमध्ये मेट्रो सेवाही बंद करण्यात आली आहे. काही दिवसात रुग्णांच्या संख्येत २३ ते ३५ टक्क्यांनी घट झाल्याचं त्यांनी सांगितलं.

Exit mobile version