Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिल्लीत पुन्हा ‘आप’चे सरकार : ‘एक्झिट पोल’चा कौल

download 1 2

नवी दिल्ली, वृत्तसंस्था | दिल्ली विधानसभेसाठी आज (दि.८) मतदान पार पडले असून आता वेगवेगळ्या वाहिन्यांचे आणि वृत्तसंस्थांचे एक्झिट पोल यायला सुरुवात झाली आहे. त्यानुसार पुन्हा एकदा ‘आप’ चे सरकार सत्तेत येणार असल्याचे दिसून येत आहे.

 

सर्वच एक्झिट पोलच्या सर्वेक्षणानुसार दिल्लीत पुन्हा एकदा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाचे सरकार येणार आहे. भाजपला मोठा फटका बसणार असून त्यांना अपेक्षित जागाही मिळणे कठीण असल्याचे दिसत आहे. काँग्रसेचे मात्र पुन्हा पानिपत होण्याची लक्षणे या एक्झिट पोलमधून दिसत आहेत.

Exit mobile version