Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिल्लीत कोरोनाच्या साथीला आता ‘ब्लॅक फंगस’च सावट

नवी दिल्ली वृत्तसंस्था । दिल्लीत कोरोना व  आता ‘ब्लॅक फंगस’च सावट घोंघावू लागलं आहे. कोरोनामुळे ‘म्यूकोरमायसिस’ मध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. या आजारामुळे डोळे, गळा आणि नाक यांना इजा पोहोचण्याची शक्यता आहे. म्यूकोरमायसिस करोनामुळे होणारं फंगल संक्रमण आहे.

‘आम्हाला कोरोनानंतर होणाऱ्या फंगल संक्रमणात वाढ होताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसात म्यूकोरमायसिस पीडित सहा रुग्ण भरती झाले आहेत. गेल्या वर्षी या संक्रमणामुळे मृत्यू दरही अधिक होता.  कित्येक लोकांना अंधत्व आलं होतं.  नाक आणी गळ्याचं हाड गळून गेलं होतं.’ असं गंगाराम रुग्णालयातील वरिष्ठ ईएनटी सर्जन डॉक्टर मनिष मुंजाल यांनी सांगितलं

‘मधुमेह असलेल्या कोरोना रुग्णांवर स्टेरॉईडचा उपयोग काळजीपूर्वक करावा लागतो. कारण त्यामुळे ब्लॅक फंगस होण्याची शक्यता आहे’, असं ईएनटी विभागाचे अध्यक्ष डॉ. अजय स्वरूप यांनी सांगितलं. ब्लॅक फंगसची लक्षण कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये दिसून येत आहेत. खासकरून मधुमेह, किडनी, हृदयरोग आणि कर्करोगासारख्या आजारांनी पीडित लोकांमध्ये ही समस्या अधिक आहे.

 

Exit mobile version