Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिल्लीत ऑक्सिजन प्रेशर कमी झाल्याने २० रुग्णांचा अंत

 

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कोरोनाच्या चौथ्या लाटेचा सामना करत असलेल्या दिल्लीत भयंकर परिस्थिती आहे  २५ रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनं दिल्ली हादरलेली असतानाच दिल्लीत ऑक्सिजन प्रेशर कमी झाल्याने एकाच रुग्णालयातील २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

दिल्लीत ऑक्सिजनअभावी २५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्ये २० रुग्णांचा ऑक्सिजनचा दाब कमी झाल्यानं मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊन ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने शुक्रवारी रात्री २० रुग्णांचा मृत्यू झाल्याचं रुग्णालयाचे डी.के. बालुजा यांनी सांगितलं.

 

सध्या २०० रुग्ण उपचार घेत असून, वेळीच ऑक्सिजन मिळाला नाही, तर त्यांचे प्राण जाऊ शकतात अशी भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे.

 

दिल्लीतील सर्वच रुग्णालयांना ऑक्सिजनाचा तुटवडा भेडसावत असून, बात्रा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी ३५० रुग्णांचे धोक्यात आल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. केवळ २५ मिनिटं पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा रुग्णालयात शिल्लक होता. रुग्णालयाने दिल्ली सरकारला एसओएस संदेश पाठवला. त्यानंतर दिल्ली सरकारकडून तातडीने एक ऑक्सिजन टँकर पाठवण्यात आला. रुग्णालयाला ८ हजार लिटर ऑक्सिजनची गरज असताना केवळ ५०० लिटरच ऑक्सिजन पुरवण्यात आला असून, केवळ १२ तासच पुरेल इतका साठा असल्याचं रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक एससीएल गुप्ता यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ३५० रुग्णांचं मरण तात्पुरतं टळलं अशीच भयावह स्थिती आहे.

Exit mobile version