Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात आग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । लोधी रोडवरील सीबीआय मुख्यालयात गुरुवारी सकाळी भीषण आग लागली. 

 

पार्किंग एरियाच्या इलेक्ट्रॉनिक खोलीत ही आग लागली. आगीनंतर धूर वाढत असल्याचे पाहून सर्व अधिकारी तत्काळ इमारतीतून बाहेर आले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणली.

 

अग्निशमन दलाच्या मदचीने आग आटोक्यात आणली गेली आहे. परंतु, ही आग कशामुळे लागली याबद्दल माहिती मिळाली नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज लावल्या जात आहे. या आगीत कुठलीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती अद्याप मिळाली नाही.

 

अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, सकाळी ११.३५ मिनिटांनी आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणण्यात आली. इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरील ट्रान्सफॉर्मर आणि वातानुकूलन प्लांटच्या खोल्यांमध्ये ही आग लागल्याची माहिती त्यांनी दिली.

 

सीबीआय अधिकाऱ्याने सांगितले की, “शॉर्ट सर्किटमुळे सीबीआय इमारतीत जनरेटरमधून धूर बाहेर येत होता. आगीने मालमत्तेचे नुकसान झाले नाही. धूरानंतर स्वयंचलित स्प्रिंकलर यंत्रणा सक्रिय झाली होती.”

 

Exit mobile version