Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिल्लीतील आंदोलनात देशभरातील शेतकरी : नवाब मलिक

मुंबई: नवी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनात फक्त पंजाबचेच नव्हेत तर देशभरातील शेतकरी सहभागी झाले असून भाजप धर्माच्या आधारावर भेद करत असल्याची बाब चुकीची असल्याचे प्रतिपादन नवाब मलिक यांनी केले आहे.

नवाब मलिक यांनी आज पत्रकारांशी बोलतांना भाजपवर टीका केली. शेतकरी आंदोलनात पंजाबचेच नाही तर इतर राज्याचेही शेतकरी आहेत. ते म्हणाले की, सुरुवातीला शेतकर्‍यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं गेलं. ट्रॅक्टर आंदोलनात घुसून भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोनल चिघळवण्याचा प्रयत्न केला. आता भाजप धर्माचा आधार घेऊन आंदोलन करत असून हे चुकीचं आहे. दिल्लीत आंदोलन करणारे शेतकरी हिंदू नाहीत का? असा सवालही त्यांनी केला.

मलिक पुढे म्हणाले की, बजेटमध्ये दीडपट हमी भाव देण्याची मागणी करण्यात आली. शेतकरी हमी भावाची मागणी करत आहेत. तुम्ही त्यांना लेखी का लिहून देत नाही, असं सांगतानाच दिल्लीतील आंदोलनात केवळ पंजाबचेच शेतकरी नाहीत, तर इतर राज्यांचेही शेतकरी आहेत. त्यामुळे केवळ हे आंदोलन पंजाब-हरियाणा पुरतं मर्यादित असल्याचं चित्रं उभं करू नका, असं आवाहनही त्यांनी केलं.

Exit mobile version