Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिल्लीतल्या इस्त्राएली दूतावासासमोर स्फोट

नवी दिल्ली । अतिशय कडेकोट बंदोबस्त असणार्‍या परिसरातील इस्त्राएली दुतावासाच्या समोर स्फोट झाला असून सुरक्षा यंत्रणांनी याची तातडीने चौकशी सुरू केली आहे.

आज विजयपथावर बिटींग द रिट्रीट या शानदार संचलनाचे आयोजन करण्यात आले. येथून अवघ्या अडीच किलोमीटर अंतरावर असणार्‍या इस्त्राएली दूतावासाच्या समोर आज सायंकाळी सव्वापाचच्या आसपास स्फोट झाला. यात आयडीई या स्फोटकाचा वापर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यात नेमकी किती हानी झाली याची माहिती समोर आलेली नाही. सुदैवाची बाब म्हणजे यात जिवीत हानी झाली नसल्याचे दिल्ली पोलिसांनी जाहीर केले आहे. दिल्ली पोलीस आणि एनआयएने तातडीने याची चौकशी सुरू केली आहे.

Exit mobile version