Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिलासा : सावदा येथील १४ कोरोना बाधीत बरे होऊन घरी परतले

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । येथील १४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. यामुळे पहिल्यांदाच सक्रीय रूग्णांची संख्या ही बरे झालेल्यांपेक्षा कमी झालेली आहे.

सावदा येथे लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर बर्‍याच दिवसांपर्यंत रूग्ण आढळून आला नव्हता. तथापि, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची बाधा वाढीस लागल्याचे दिसून येत असून अधून-मधून रूग्ण संख्या वाढत आहे. आजवर येथील ३३ रूग्णांना कोरोनाची बाधा झाली असून यातील सहा जणांचा मृत्यू झालेला आहे. तर १४ जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिसचार्ज देऊन घरी पाठविण्यात आले आहे. यामुळे आता उपचार सुरू असणार्‍या रूग्णांची संख्या १३ इतकी राहिली आहे. अर्थात, पहिल्यांदाच बर्‍या झालेल्या रूग्णांची संख्या ही बाधीतांपेक्षा जास्त झाल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version