Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिलासा : रावेरला दोघांची कोरोनावर मात

रावेर प्रतिनिधी । आज रावेरच्या कोविड सेंटरमधून दोघांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले असून यासोबत निगेटीव्ह रिपोर्ट आलेल्या १० जणांनाही डिस्चार्ज मिळाला आहे.

आज रावेर कोविड सेंटर वरुन दोन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण बरे होऊन त्यांना त्यांच्या घरी रवाना करण्यात आले. तर सोबत इतर इतर दहा जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना देखिल रवाना करण्यात आले असल्याची माहिती डॉ एन. डी. महाजन यांनी दिली आहे.

दरम्यान, तालुक्यातील ऐनपुर येथे ६० वर्षीय वृध्द आज एक जण पुन्हा कोरोना पोझिटीव्ह असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ एन. डी. महाजन यांनी दिली आहे. आज एकूण दहा रिपोर्ट आले असून त्यापैकी नऊ निगेटीव्ह आहेत.

Exit mobile version