Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिलासा : पाचोरा व अमळनेरचे २४ तपासणी अहवाल निगेटीव्ह

जळगाव प्रतिनिधी । आज रात्री उशीरा आलेल्या रिपोर्टमध्ये पाचोरा व अमळनेरचे सर्वच्या सर्व म्हणजे २४ अहवाल हे निगेटीव्ह आल्याने आरोग्य यंत्रणांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

आज रात्री उशीरा पाचोरा आणि अमळनेर येथील एकूण २४ अहवाल निगेटीव्ह आले आहेत. याआधी जाहीर करण्यात आलेल्या अपडेटमध्ये अमळनेर येथे दोन कोरोना बाधीत आढळून आले होते. यात पाचोर्‍याचा एकही रूग्ण पॉझिटीव्ह आढळला नव्हता. यानंतर रात्रीच्या रिपोर्टमध्येही पाचोर्‍यात रूग्ण आढळून न आल्याने तालुक्यातील आरोग्य यंत्रणांना बर्‍याच प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तर मध्यंतरी अमळनेरात प्रचंड प्रमाणात संसर्ग आढळून आला असला तरी आता याचे प्रमाण थोडे कमी झाल्याचे दिसून येत आहे. आज शहरात दोन पॉझिटीव्ह आढळल्यानंतर सर्व रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. यामुळे येथील प्रशासनालाही बर्‍याच प्रमाणात दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version