Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिलासादायक : धुळे-चाळीसगाव मेमू रेल्वे सोमवारपासून धावणार‍

भुसावळ प्रतिनिधी । कोरोनामुळे बंद असलेली आठ डब्याची मेमू गाडी धुळे-चाळीसगाव ही रेल्वे सोमवार १३ डिसेंबर पासून धावणार असल्याची माहिती भुसावळ रेल्वे प्रशासनाने दिली आहे. लोकप्रतिनिधींच्या पाठपूराव्यामुळे दिवसातून दोन वेळा या गाडीच्या फेऱ्या होणार आहे. मात्र रविवारी बंद ठेवण्यात येणार आहे.

चाळीसगावचे खासदार उन्मेष पाटील यांनी पॅसेंजर गाडी सुरू करण्यासंदर्भात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानबवे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता शिवाय प्रवाशांसह प्रवासी संघटनांनीदेखील वेळोवेळी या संदर्भात मागणी लावून धरली होती. अखेर मागणीला यश आल्याने समाधान व्यक्त होत आहे.

मेमू गाडी क्रमांक 01303 ही चाळीसगाव येथून पहाटे 6.30 निघाल्यानंतर धुळ्यात 7.35 वाजता पोहोचणार आहे तर मेमू गाडी क्रमांक 01313 सायंकाळी 5.30 वाजता चाळीसगाव येथून सुटल्यानंतर 6.35 वाजता धुळ्यात पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात धुळे येथून गाडी क्रमांक 01304 सकाळी 7.50 वाजता सुटल्यानंतर सकाळी 8.55 वाजता चाळीसगावात पोहोचणार आहे तसेच गाडी क्रमांक 01314 सायंकाळी 7.20 वाजता सुटल्यानंतर रात्री 8.25 वाजता चाळीसगावात पोहोचणार आहे.

धुळे-चाळीसगाव मार्गावर एकही एक्स्प्रेस अथवा पॅसेंजर सुरू नसल्याने सातत्याने पॅसेंजर सुरू करण्याची मागणी होत होती. गोरगरीब, मध्यमवर्गीयांना आर्थिकदृष्ट्या परवडणारी व सुरक्षित प्रवास म्हणून या रेल्वे वाहतुकीकडे पाहिले जाते. सोमवार, 13 डिसेंबरपासून मेमू गाडी सुरू करण्याचा निर्णयामुळे  चाकरमान्यांसह रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Exit mobile version